बिनविरोध निवडणुकीवर अश्विनी जगताप यांचं परखड मत | Chinchwad

2023-03-03 348

चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बिनविरोध निवडणुकीवर परखड मत व्यक्त केलं आहे. विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास तिथं निवडणूक न लढवीता ती जागा बिनविरोध द्यायला हवी. उगाच निवडणूक लढवून त्या कुटुंबावर ओरखडे ओढणे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमदार झाल्यानंतर अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मतदार संघातील पिंपळे गुरव येथे असलेल्या कार्यालयात येऊन कामकाज पाहण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

Videos similaires